Posts

Showing posts from October, 2019

रखुमा माझी पेरणी करी

Image
रखुमा माझी पेरणी करी माझा पांडूरंग नांगर धरी माझी शेती ही पंढरी ||धृ.|| अठरा धान्य मीच पिकवितो चोर लूटारूंचे घर मी भरतो निसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरी माझी शेती ही पंढरी ||1|| मजूर माझा भाऊ धाकटा कधी होणार नीटनेटका....(2) कष्ट करूनी सदा भाकितो संसाराच्या घरी माझी शेती ही पंढरी ||2|| धान्य पेरीले बहू मोलाचे पंचतत्त्वे तया रक्षिले तुका म्हणे जाऊ पाहाया वैकूंठीचा हरी रखुमा माझी पेरणी करी ||3||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...