Chale he sharir konachiye satte abhang
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥ देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥ मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥ वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥ तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥