पालखी निघाली राजाची – Lalbaugcha Raja Song Lyrics | Palkhi Nighali Rajachi Ganpati Song
"पालखी निघाली राजाची" हे लाडक्या लालबागच्या राजावर आधारित सुप्रसिद्ध मराठी गणपती गाणं आहे. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि भाविकांचा लाडका गणपती आहे, ज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त येतात. या गीतात लालबागच्या राजाची पालखी मिरवणूक, भक्तांचा उत्साह, मोदक-लाडूचा नैवेद्य, आणि भक्तीमय वातावरण यांचे सुंदर वर्णन आहे. गायक अवधूत गुप्ते, संजय सावंत, शकुंतला जाधव आणि श्रीकांत नारायण यांच्या आवाजात हे गीत सादर झाले आहे
About Lalbaugcha Raja
लालबागचा राजा हा मुंबईतील लालबाग परिसरात दरवर्षी गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापित होणारा सर्वात प्रसिद्ध गणपती आहे. 1934 साली या मंडळाची स्थापना झाली. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून तो ओळखला जातो, आणि त्याला "नवसाचा गणपती" म्हटले जाते. 10 दिवसांच्या गणेशोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. त्याची मूर्ती भव्य, दरवर्षी वेगळ्या थाटात सजवली जाते, आणि देशभरातून लोक इथे येऊन बाप्पाचे दर्शन घेतात.
Marathi Lyrics
पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात
लालबागचा राजा, माझा बसलाय नटून थाटात
माझा बसलाय नटून थाटात ॥ धृ ॥
राजा बसलाय डौलात
भक्त नाचे आनंदात
धर्म रूढी जुगारून
सारे विसरुनी भान
खांदा लावलाय पालखेला
राजा चाललाय झोकात ॥ १ ॥
वक्रतुंडाचा बोलावणं
होकार दिला आनंदानं
गेलं गणेश नगर दिपून
लालबाग राजाच्या तेजानं
मोदक लाडवाचा नैवेद्य
ठेवलाय चांदीच्या ताटात ॥ २ ॥
राजा सिंहासनी शोभतो
मनी चंद्रमा लाभतो
श्री मुकुट डौलतो
जैसा मयूर नाचतो
स्नान घालाया राजाला
ठेवलाय दही दूध माठात ॥ ३ ॥
महादेवासी एक वर
एक गण तेज स्वर
दिले असे वर्दान
तुला पालखीत मिरवीन
लालबाग राजा करी पूर्ण ॥ ४ ॥
ज्ञान जिष्णून हे आले
मुळ पिठाला मिळाले
असे महादेव वदले
माझे कार्य पूर्ण झाले
प्रति शंकराचा अवतार
बाप्पा लालबागचा साक्षात ॥ ५ ॥
Palkhi Nighali Rajachi is a popular Marathi Ganesh song from Lalbaugchya Rajacha Vijay Aso, celebrating Mumbai’s most famous Ganpati – Lalbaugcha Raja. This iconic deity has been the center of devotion since 1934, attracting millions of devotees every Ganesh Chaturthi. The song captures the grandeur of the procession, the divine blessings, and the deep faith of devotees. Perfect for Ganesh Utsav playlists, bhajans, and Lalbaugcha Raja fans.
Palkhi Nighali Rajachi ya ho Ganesh Nagrat
Lalbaugcha Raja, maza baslay natun thatat
Maza baslay natun thatat ॥ Dhru ॥
Raja baslay daulat
Bhakt nache anandat
Dharm rudhi jugaarnun
Sare visaruni bhan
Khanda lavlay palkhela
Raja chalalay jhokat ॥ 1 ॥
Vakratundacha bolavnan
Hokar dila anandan
Gela Ganesh nagar dipun
Lalbaug rajachya tejan
Modak ladvacha naivedya
Thevalay chandichya tatat ॥ 2 ॥
Raja sinhasani shobhato
Mani chandrama labhato
Shri mukut daulato
Jaisa mayur nachato
Snan ghalaya rajala
Thevalay dahi dhoodh mathat ॥ 3 ॥
Mahadevasi ek var
Ek gan tej swar
Dile ase vardan
Tula palkhit mirvin
Lalbaug raja kari poorn ॥ 4 ॥
Dnyan jishnoon he ale
Mul pithala milale
Ase Mahadev vadale
Maze karya poorn jhale
Prati Shankaracha avatar
Bappa Lalbaugcha sakshat ॥ 5 ॥
Album: Lalbaugchya Rajacha Vijay Aso
Singer: Avadhoot Gupte, Sanjay Sawant, Shakuntala Jadhav, Shrikant Narayan
Music Director: Nitin Morajkar
Director: Jayesh Veera, Bhadrik Veera
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta