“महाराष्ट्रातील कोकण परिसर आणि गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे वर्णन करणारे हे गजरभजन सुप्रसिद्ध कीर्तनकार बुवा काशीराम परब यांनी सादर केले आहे. कोकणची संस्कृती, गणेशभक्ती आणि पारंपरिक वेश यांचे सुंदर चित्रण या भजनात आहे.” गायक / गीत / संगीत बुवा काशीराम परब महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण | या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण ॥धृ॥ महाड चिपळून संगमेश्वर पुढे लांजा राजापूर | दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्हयावर | गणेश पुजती लक्ष वेधिती शक्ती तुरा नाचून ॥१॥ खारे पाटण नांदगाव तिठा कणकवली कसाल आणि कट्टा | कुडाळ-पावशी पांदुरलिटा पुढे मालवण किनार पट्टा । गौरी गणपती आणून पुजती घरो घरी सारे जण ॥२॥ ठाणे रायगड-रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नगरी । येथे कोकणच्या वस्ती भारी कुणी वसती सागर तीरी । गणपती त्यांचे आराध्य दैवत गरीब असो धनवान ॥३॥ दरवरसाला चाकरमानी जाती एसटी करुन घरी। कोणी कोकण रेल्वे नी कोणी मिळेल ते वाहन करुनी | वार्षीक उत्सव साजरा करीती गणपतीला भजूनी ॥४॥ अशा कोकणच्या चाली रिती पहाण्या गावास भेटी देती । गणपतीची आरती काशिरामाच...