याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण lyrics

याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण 



याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे
बाई घ्यागे सई घ्यागे ।।धृ।।

घरी करीत होते काम धंदा
वेणू वाजविले नंदाचिये नंदा
विसरले मी काम धंदा ।।१।।

घरी सासुचा जाच माझा भारी
जावा नंदा नांदती परोपरी ।।२।।

तान्हे बालक आले कुणी घरा
घरी सासू सासरा म्हातारा
याच्या मुरलीने जीव झाला घाबरा ।।३।।

वेणू न्हवे विषमज वाटे
नाद ऐकता काम मनी दाटे
मध्वनाथाची मूर्ती हृदयी भेटे ।।४।।

Comments

Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics