Posts

भस्म उटी रुंडमाळा lyrics बुवा विठ्ठल गावकर

 भस्म उटी रुंडमाळा     भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥  गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥   भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥   सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण घागर डोईवरी निघाली पाण्याला  गौळण पायी वाजती रुमझुम पैंजण ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने.. हासत खुदुखुदू मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी.. वाट अडवी सारंगधर सोडी कान्हा जाऊ दे लवकर धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला.. किती किती खोड्या करीसी हरी जाईन लवलाही सांगेन यशोदा बांधीन उखळासी मारीन मुसळाने एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी..

तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी lyrics बुवा संतोष रेडकर

  तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी  कान्हामी आले जशीच्या तशी धावुनि ||धृ|| झाडीत होते माझे मी अंगण तेथेच राहिली कणी रे कान्हा ||१|| न्हात होते न्हानि घरात तेथेच राहिले पाणी रे कान्हा ||२|| घालीत होते माझी मी वेणी तेथेच राहिली फणी रे कान्हा ||३|| एका जनार्दनीं राधा गौळण कृष्ण मनी झाली लिन राधा ||३||

टाळ मृदुंग गर्जती अभंग Lyrics in marathi samir kadam

  टाळ मृदुंग गर्जती टाळ मृदुंग गर्जती माझ्या विठ्ठलाची कीर्ती ।। गळा वैजयंती माळा कानी कुंडले शोभती ।। येतील जेव्हा वारकरी धूम धुमते पंढरी ।। देहभावाने गुण गाती नामा म्हणे तो आरती ।।

जाते मथुरा बाजारी गौळण lyrics

 जाते मथुरा बाजारी  जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी  सोड सोड ना वाट माझी थांबना  देते दहि दूध लोणी तुझ मोहना ।।धृ।।    नटखट तुरे हरी मुरारी  गोकुळची मी  राधा गोरी   बरी नाही मस्करी ऐकरे कान्हा ।। वाईट तुझी खोड नाही तुझी माझी जोड  सवय ही आता सारी तू सोड  तिन्ही सांजा झाल्या जरा तू ऐकना ।।   दूर मथुरेचा घाट सोड माझा तू रे हात     बघून लिन झाला चरणी विश्वनाथ  घेवोनिया पिचकारी उडवू नको रंग ना ।।

हे गजानना श्री गणराया करू आरती मी तुजला aarti lyrics in marathi

Image
  गणपती आरती हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥   हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला   रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥   हे गजानना श्री गणराया  करू आरती मी तुजला   लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना। सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणीरक्षावे सुरवरवन्दना॥   जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

श्री गणेशा गौरी गणेशा संतोष रेडकर

Image
श्री गणेशा गौरी गणेशा  श्री गणेशा गौरी गणेशा प्रनव ओमकारा || हे ओमकारा करुणा अवतारा रंग भरुदे आमच्या भजना || सप्त स्वरांची माळा गुंफूनी मृदुंग वाजे ताल धरुनी ओमकाराचे करूया पुजन || Shree marathi
Book Cover
स्पिरिच्युअल अवेकनिंग
श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज - भाग १
खरेदी करा

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

हे भगवंता दिन दयाळा अभंग he bhagwanta din dayala lyrics

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण Lyrics