हरी मी तुझा काय केला गुन्हा gavlan lyrics in Marathi

हरी मी तुझा काय केला गुन्हा

कारे रोखियली नजर ,तू जरी वाटे मजला बाळ 

 धरू नकोस माझा हात पुन्हा


    हरी मी तुझा काय केला गुन्हा

तुझा माझा सात जन्माचा जीव भावाचा 

घरोबा जुना घरोबा जुना घरोबा जुना ||ध्रु||


      इकडे माहेर तिकडे सांसर 

     हरी सोड सोड माझी वाट रे

      कस सांगू भुललिया कुणा. . ||१||


    घागर घेऊनी पाणीयासी जाता

     हरी सोड सोड माझी घागर रे

       कस सांगू भुललिया कुणा ..||२||


     एका जनार्दनी समरस झाली

   आणि हरी चरणी राधिका आली 

       कस सांगू भुललिया कुणा...||३||

Comments